पुणे हादरलं!! सहायक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्याचा गोळ्या झाडून केला खून, स्वतःवरही झाडल्या गोळ्या..


पुणे : पुण्यात सध्या एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला.

त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मोनी गायकवाड (वय. ४४, पुतण्या दीपक गायकवाड (वय. ३५) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवले.

या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अजून सविस्तर माहिती समोर आली नाही. कुटूंबिक वादातून हे घडलं असल्याचे सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!