मद्यप्राशन करुन नागिन डान्स, पोलीस अधिकाऱ्यांचा प्रताप, व्हिडिओ व्हायरल….!

पुणे : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये पोलिस अधिकारी मद्यप्राशन करुन डान्स करीत असल्याचे दिसत आहे. केरळ मधील हा व्हिडिओ आहे. मंदिर परिसरात पोलिस अधिकाऱ्याने दारुचे सेवन केल्यानंतर डान्स केला आहे.

यामुळे हा पोलीस अधिकारी अडचणीत आला आहे. पोलिस या घटनेची कसून चौकशी सुरु आहे. आरोपी ईशानपारा पोलिस स्टेशनमधील सहाय्यक उपनिरीक्षक आहे. यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी केली जात आहे.
येथील मंदिर परिसरात पोलिसांचं संरक्षण देण्यात आलं होतं. त्यावेळी अधिकारी तिथं बंदोबस्तासाठी होता. असे असताना अधिकाऱ्याने दारू पिऊन डान्स केला. सोशल मीडियावर त्या अधिकाऱ्याचा डान्स केलेला व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.

या अधिकाऱ्यावर कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ ज्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यावेळी अनेक अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. याबाबत अजून तपास केला जात आहे.