काय सांगता ! पंतप्रधान मोदींचे मंदिर झालं, आता सोन्याची मूर्तीही तयार…!

सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक बदल झाले. असे असताना त्यांचा चाहता वर्ग हा वाढतच चालला आहे. नरेंद्र मोदी यांची देशभरात अनेक ठिकाणी मंदिरं तयार करण्यात आली आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूरतमध्ये चक्क सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली आहे.

यामुळे सोशल मीडियावर याची चर्चा सुरू आहे. 18 कॅरेट सोन्यापासून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे अजूनही मोदींची लोकप्रियता किती आहे, हे यावरून दिसून येते.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं 156 जागांवर विजय मिळवला होता. त्या पार्श्वभूमीवर 156 ग्रॅम वजनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली होती.

विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 156 ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार केली आहे, असे राधिका चेन्स कंपनीच्या मालकाने सांगितले. अनेक लोकांनी ही मूर्ती खरेदी करण्यासाठी उत्साह दर्शवला आहे.
गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती चर्चेचा विषय आहे. मूर्तीकारांनी ही मूर्ती विकण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र ती खरेदी करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.