PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुण्यात घणाघात!! म्हणाले, हा मोदी आहे, घरात घुसून मारणार…..


PM Narendra Modi : पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे, मोदी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, दहशतवाद्यांना घरात घुसून मारणार, 10 वर्षांआधी भारतावर दहशतवादी हल्ले व्हायचे, मुंबईत दहशतवादी हल्ले व्हायचे, काशीमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, अयोध्येमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झालं आहे.

जे शेजारचे आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे, त्यांना आता अन्न मिळणं कठीण झालं आहे. पीएफआयवर प्रतिबंध लावला. हा मोदी आहे, घरात घुसून मारेल, अशा कडक शब्दात मोदींनी दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. यावरून त्यांनी विरोधकांवर देखील टीका केली आहे.

देशात कधीच धर्मांच्या आधारावर आरक्षण लागू होऊ शकत नाही. धर्माच्या आधारे आरक्षण देऊन देशाचे विभाजन करण्याचे काम भारत आघाडी करत आहे. यामुळे या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा, असेही मोदी म्हणाले.

मोदी अजूनही जिवंत आहेत. मोदी हे होऊ देणार नाहीत. काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवादाला चालना मिळाली. मुंबई आणि पुण्यात रक्तस्त्राव झाला. मुंबईत बॉम्बस्फोट व्हायचे, काशीत व्हायचे. पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असेही ते म्हणाले.

तसेच ते म्हणाले, फक्त 10 वर्षात सव्वा लाखाहून अधिक स्टार्टअप तयार झाले आहेत. गर्वाची गोष्ट म्हणजे यातील अनेक स्टार्टअप पुण्यात आहेत. आम्ही नीतीगत बदल केले आहेत. काँग्रेसच्या काळात असे कधी घडत नव्हते, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर देखील हल्ला केला आहे. PM Narendra Modi

2014 आधी काँग्रेस सरकारने 10 वर्षात मुलभूत विकासावर जेवढा खर्च केला, तेवढा आम्ही एका वर्षात केला, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. येणाऱ्या काळात देखील अनेक बदल होतील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!