PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती निवडणूक लढवण्याची ऑफर, ‘लखपती दीदी’ चंदा देवी आहेत तरी कोण? जाणून घ्या.…


PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. मोदी हे त्यांच्या भाषणांसाठी देशभर प्रसिद्ध आहेत, पण त्यांनाही त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील वाराणसीतील एका महिलेचे भाषण इतके आवडले की त्यांनी तिला निवडणूक लढवण्याची ऑफर दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विकासनशील भारत संकल्प यात्रेअंतर्गत विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बचत गटाच्या महिलांच्या कार्यक्रमात देखील पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात चंदा देवी नावाच्या महिलेच्या भाषणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके प्रभावित झाले की, त्यांनी या महिलेला थेट निवडणूक लढवण्याची ऑफर देऊन टाकली.

मतदारसंघ वाराणसीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदादेवी यांना निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. वास्तविक चंदादेवी सेवापुरी गावात भाषण देत होत्या. त्यांच्या भाषणाने पीएम मोदी इतके प्रभावित झाले की ते म्हणाले, ‘तुम्ही खूप चांगले भाषण देता, तुम्ही कधी निवडणूक लढवली आहे का?’ त्यावर चंदादेवी यांनी नकार दिला. PM Modi

पीएम मोदींनी पुढे विचारले, ‘ निवडणूक लढवणार का?’ उत्तर देताना चंदादेवी म्हणाल्या की, ‘आम्ही कधीही निवडणूक लढवण्याचा विचार केला नाही. आम्ही फक्त तुमच्याकडून प्रेरित आहोत. तुमच्या समोर उभे राहून स्टेजवर दोन शब्द बोलणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

चंदादेवीने सांगितले की, तिने २००४ मध्ये इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी 2005 मध्ये तिचे लोकपती पटेल यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी शिक्षण सोडले. सध्या त्यांना दोन मुले आहेत.

मोठी मुलगी प्रिया १४ वर्षांची असून ती हिंदी माध्यमाच्या खाजगी शाळेत शिकते. लहान मुलगा ८ वर्षांचा अंश असून तो सध्या सरकारी शाळेत शिकतो. चंदादेवी म्हणाल्या की, मला जास्त अभ्यास करता येत नाही, पण आपल्या मुलांनी चांगल्या कॉलेजमध्ये चांगले शिक्षण घ्यावे अशी इच्छा आहे.

‘राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान’ सुरू झाल्यापासून त्यांनी त्यांच्या गावात गटाध्यक्ष म्हणून काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या महिन्यापासून १९ महिन्यांपासून त्या बर्की गावातील युनियन बँक ऑफ इंडियाची ‘बँक सखी’ आहेत. चंदा देवी सांगतात की त्या गावातील बचत गटातील महिलांची सुमारे ८०-९० बँक खाती पाहतात, शिवाय गरजूंना कर्जही देतात. आता चंदा देवी यांची जोरदार चर्चा सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!