पाकिस्तानात आता आम्हाला फक्त पंतप्रधान मोदींची गरज…!

नवी दिल्ली : पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजद हिने एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतातही चर्चेचा विषय बनला आहे. देशातील आर्थिक संकटानंतर एक पाकिस्तानी तरुण कसे आपलेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विरोधात घोषणा देत आहे, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार प्रशंसा करत आहे. 1947 मधील फाळणीलाही शाप दिला जात आहे.
YouTuber सना अमजद हिने पोस्ट केलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये, एक पाकिस्तानी तरुण देशातील चालू घडामोडींवर शेहबाज शरीफ सरकारच्या विरोधात घोषणा देताना दिसत आहे आणि म्हणत आहे की पाकिस्तानात पंतप्रधान नरेंद्र मोदी असते तर आपण देखील वाजवी किमतीत वस्तू खरेदी करू शकलो असतो.
व्हायरल व्हिडीओमध्ये ती एका स्थानिक व्यक्तीला विचारताना दिसत आहे की, ‘पाकिस्तान से जिंदा भागो चाहे इंडिया चले जाओ’ ही घोषणा रस्त्यावर का लावली जात आहे? यावर तो माणूस उत्तर देतो की तो पाकिस्तानात जन्म होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. त्याचा जन्म भारतात झाला असता तर त्यांना अशा त्रासाला सामोरे जावे लागले नसते.