PM Modi : ब्रेकिंग! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, अचानक एअरपोर्टवर थांबले अन्…
PM Modi : एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे देवघर विमानतळावर त्यांचे विमान उतरवण्यात आले आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या प्रवासास विलंब होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात प्रचाराच्या दौऱ्यावर होते. हा त्यांचा दौरा गुरूवारीच संपला होता. शिवाजी पार्कवर त्यांची शेवटची सभा पार पडली होती.
या सभेनंतर ते दिल्लीत परतले होते. आज पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर होते. या दरम्यान पंतप्रधान मोदी एका विशेष विमानाने देवघर आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने जमुईला गेले होते. PM Modi
त्यानंतर परतीच्या प्रवासा दरम्यान पंतप्रधान मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे. विमानातील या तांत्रिक समस्येनंतर देवघर विमान तळावर विमान उतरवण्यात आले आहे.तसेच या घटनेने नरेंद्र मोदींच्या या पुढील प्रवासासा उशीर होत आहे.