PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर, पोलिसांनी दिल्या महत्वाच्या सूचना, जाणून घ्या…


PM Modi : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात कडक सूचना पुणे पोलिसांना देण्यात आल्या आहेत. दहशतवादी संघटनांकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेता, पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेकडून या सूचना देण्यात आल्या आहेत. PM Modi

पाेलिसांना मिळाल्या या सूचना…

०७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या हद्दीतील हॉटेल, लॉजेस, धर्मशाळा व इतर सार्वजनिक ठिकाणे चेक करून तेथे मिळून येणार्‍या व्यक्तींची शहानिशा करावी.

चेकिंगमध्ये मिळून येणारे आक्षेपार्ह वस्तू व स्फोटके, दारूगोळा शस्त्रे व इतर घातक वस्तू किंवा अन्य संशयित वस्तू आढळून आल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करावी.

आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जातीयवादी गुंड, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून संशयित लपण्याच्या जागेची माहिती घेऊन त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी.

आपापल्या हद्दीतील एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, पीएमटी बस स्टॅण्ड त्याचप्रमाणे महत्त्वाची धार्मिकस्थळे येथे लक्ष ठेवून संशयित व्यक्ती मिळून आल्यास त्याबाबत शहानिशा करून पुढील योग्य ती कारवाई करावी.

रात्रीच्या वेळी शहराबाहेरून येणारी वाहने, त्यातील व्यक्ती यांची तपासणी करून शहानिशा करावी. रात्री गस्तीस असणारे पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना तशा सूचना द्याव्यात व नाईट राऊंड अधिकारी यांनी याबाबत खबरदारी घ्यावी.

पंतप्रधानांच्या मार्गावरील नवीन बांधकाम सुरू असणारी ठिकाणे, रस्त्यांच्या कामाची ठिकाणे, तेथील कामगार तसेच रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅण्ड वगैरे परिसरामध्ये उघड्यावर उतरलेले लोक यांची बारकाईने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.

महत्त्वाची धार्मिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, परदेशी नागरिक भेटी देणारे हॉटेल्स यालगत काही संशयितरीत्या वावरणार्‍या व्यक्ती आढळून आल्यास त्यांची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी.

संबंधित सहायक पोलिस आयुक्त यांनी आपापल्या हद्दीतील हत्यारे, दारूगोळा विक्री करणारे व दारूगोळा साठा ठेवणारे विक्रेते यांच्या दुकानांची तपासणी करून अधिक माहिती घ्यावी व काही संशयित वाटल्यास योग्य ती कारवाई करावी.

हद्दीतील परदेशी नागरिक, विद्यार्थी यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून काही संशयित आढळून आल्यास त्वरित योग्य ती कारवाई करावी.

पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहात असलेल्या सीमी संघटनेच्या व इंडियन मुजाहिद्दीन कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच त्यांच्या संशयित हालचाली दिसून आल्यास त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करावी.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!