मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्याचा फोन, देशात खळबळ…!


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले.

याबाबत माहिती अशी की, बॉम्ब ठेवल्याचा फोन एका व्यक्तीने केला. निवासस्थानात अनेक ठिकाणी हे बॉम्ब आपण स्वतः ठेवल्याचा दावा त्या व्यक्तीचे केला आहे. यानंतर तातडीने पंतप्रधानांच्या घराला सुरक्षा यंत्रणेकडून घेरण्यात आले.

बॉम्ब विरोधी पथकाने सगळीकडे तपासणी केली आहे. यामध्ये काहीही हाती लागले नाही. फोन करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. दिल्लीच्या दयालपूर भागातला हा रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

या व्यक्तीचे नाव रवीद्र तिवारी असे आहे. त्याच्या पत्नीचे इतर कोणाशी संबंध असल्याचाही त्याला संशय आहे. यामध्ये पोलीस काहीच करत नसल्याने त्याने खळबळ उडवून देण्यासाठी हा कॉल केल्याचे सांगितले. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. यामुळे मात्र यंत्रणेची पळापळ झाली असून पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!