शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PM Kisan निधीचा 13 वा हप्ता उद्या जमा होणार…!
नवी दिल्ली : होळीच्या सणाच्या आधी कृषीमंत्र्यांनी ही बातमी सांगितली आहे ज्याची देशातील करोडो शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. पीएम मोदी कर्नाटकातील बेळगाव येथे हा हप्ता जारी करतील, असे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता उद्या (ता.27) रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल. म्हणजेच मार्चपूर्वीच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील.
कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी देशातील सुमारे आठ कोटी पीएम शेतकरी लाभार्थ्यांना हा हप्ता जारी करतील. यासोबतच ते शेतकऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. कृषी मंत्री तोमर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 13 वा हप्ता हस्तांतरित करतील आणि शेतकरी बंधू-भगिनींशी संवाद साधतील.
कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच, सध्याच्या शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन KYC करून घ्यावे लागेल. या वेबसाइटवर, उजव्या बाजूला, तुम्हाला फार्मर्स कॉर्नर पर्यायावर eKYC लिंक दिसेल. येथे आधार क्रमांक टाकून आवश्यक माहिती द्यावी लागेल. सबमिट वर क्लिक करताच प्रक्रिया पूर्ण होईल.