Pimpri Crime : चोरी करण्यास नकार दिल्याने महिलेचे पाडले दात, पिंपरी मधील धक्कादायक घटना..

Pimpri Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असे म्हटले तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

सोबत चोरी करण्यासाठी येण्यास महिलेने नकार दिला. त्याचा राग आल्याने महिलेला मारहाण करत तिचे दात पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२४) रात्री साडेसातच्या सुमारास पिंपरी येथील संजय गंधीनगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सुभाष उर्फ चेंड्या मनोज टाक (वय.४५ रा. सुभाष नगर, रिव्हर रोड, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला हिने तिचा मित्र संशयित सुभाष याने त्याच्याबरोबर चोरी करण्यासाठी नकार दिला. संशयिताने महिलेकडे पैशांची मागणी केली. मात्र, महिलेने त्यास नकार दिल्याने संशयित सुभाष याने चिडून महिलेस मारहाण केली.

या मारहणीत महिलेचे चार दात संशयिताने पाडले. तसेच हातावर मारून हात फॅक्चर केला. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.