Pimpri Chinchwad Crime : धक्कादायक! घरखर्चासाठी पैसे न दिल्याने पत्नीकडून पतीचा खून, दिघी परिसरातील घटनेने खळबळ…


Pimpri Chinchwad Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

पतीने घर खर्चासाठी पगाराचे पैसे न दिल्याने पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना दिघी परिसरात घडली आहे. ही घटना सोमवारी (ता. १८) दुपारी सव्वा एकच्या सुमारास दिघी येथील भारतमातानगर येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. Pimpri Chinchwad Crime

रवींद्र बाबुलाल नागरे (वय.३९ रा. भारतमाता नगर, दिघी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भारती रवींद्र नागरे हिच्यावर दाखल करुन अटक केली आहे. याप्रकणी मयत रवींद्र नागरे याच्या बहिणीने दिघी पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.२१) फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, , रविंद्र नागरे हे दिघी परिसरातील एका पेट्रोल पंपावर काम करत होते. घर खर्चासाठी पगाराचे पैसे दिले नाहीत याकारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद होऊन झटापट झाली. यानंतर आरोपी पत्नीने रवींद्र याला हाताने मारहाण केली.

तसेच त्याच्या चेहऱ्यावर हाताच्या नखाने वरखाडे ओढुन त्याला सोफ्यावर जोरात ढकलले. त्यामुळे रवींद्र यांच्या नाकाला, गळ्याला, कपाळाला गंभीर दुखापत झाली. यानंतर पत्नीने रवींद्र याचा ड्युटीचा शर्ट नाकावर दाबून त्याला जीवे ठार मारले.

रवींद्र याच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपी पत्नीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिमसेन शिखरे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!