Petrol Diesel Price : मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी मोठा धमाका! पेट्रोल डिझेल झाले स्वस्त, वाचा महाराष्ट्रातील नवीन दर…


Petrol Diesel Price : देशातील सर्वसामान्य जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे दोन रुपयांनी घट झाली आहे. शुक्रवारी (ता.१५) मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 रुपये प्रति लिटर होता, तर 14 मार्च रोजी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर होता.

तसेच यासोबतच मुंबईत डिझेलचे दरही कमी झाले आहेत. 15 मार्च रोजी मुंबईत डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे. तर 14 मार्च रोजी येथे डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर होते.

दररोज प्रमाणेच सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 2 रुपयांनी कपात झाल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान,मुंबईत शुक्रवारी पेट्रोलचा दर 104.21 रुपये प्रतिलिटर आहे. आज डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.66 रुपये आहे. Petrol Diesel Price

तर 14 मार्च रोजी येथे पेट्रोल 106.56 रुपये प्रतिलिटर विकले जात होते. 15 मार्च रोजी नागपुरात पेट्रोलचा दर 104.06 रुपये प्रति लिटर होता, तर 14 मार्च रोजी येथे पेट्रोलचा दर 106.06 रुपये प्रति लिटर होता. आता दर कमी झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!