पुण्यातील वाहतूक कोंडीवर होणार कायमचा उपाय!! मेट्रोचा विस्तार होऊन ७ नवीन मार्ग, अन् ५५ स्टेशन होणार…


पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आता मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. याठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती खूपच गंभीर आहे. यामुळे याठिकाणी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या अनुषंगाने पुण्यात मेट्रो सुरू करण्यात आली असून सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो सुरू आहे.

आता या दोन्ही मार्गांचा विस्ताराचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारीकरणाच्या कामांना मंजुरी सुद्धा मिळाली आहे. यामुळे याची कामे देखील लवकरच पूर्ण होणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या दरम्यान मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे.

दरम्यान, याची या मार्गासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता प्रत्यक्षात या मार्गाचे काम देखील सुरू होईल. नंतर स्वारगेट ते कात्रज मार्गाच्या प्रकल्पाचे काम देखील पुढे सरकले आहे. हे देखील लवकरच पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

ही कामे झाल्यानंतर पुणेकरांचा प्रवास सुपरफास्ट होणार असून वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळेल. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्यात सात प्रस्तावित मार्गांचा समावेश आहे, यातील अनेक मार्ग केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ही कामे झाली की रोडवरील गाड्या कमी होऊन सार्वजनिक प्रवास वाढेल. तसेच वेळेची बचत होईल.

तसेच वनाज ते चांदणी चौक दरम्यान मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. हा १.२ किमी लांबीचा मार्ग असून यावर दोन स्थानके असतील. तसेच रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी दरम्यानही ११.६३ किमी लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होणार आहे. यामध्ये ११ स्थानके आहेत.

तसेच सर्वात महत्वाचा खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी हा मार्ग २५ किमी लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात ही कामे पूर्ण होऊन मोठ्या प्रमाणावर वाहतूक व्यवस्था व्यवस्थित होणार आहे. यामुळे मोठा वेळ वाचणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!