‘त्या’ क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल ३० लाख उकळले, दोन महिलांसह चौघांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा..


पुणे : मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्याचे अश्लील फोटो काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून ३० लाख रुपये घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन महिलासह चौघांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपी अरबाज हनीफ सिप्पी (वय.२४), हनीफ इस्माईल सिप्पी (वय.४०) यांच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १९ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. ही घटना फेब्रुवारी २०१९ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान, ठाणे, लोणावळा येथे घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरबाज याने तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला. यानंतर त्याने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले.

त्यानंतर शारीरिक संबंध ठेवतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी अरबाज आणि इतर आरोपींनी तरुणीकडे वारंवार पैशांची मागणी केली.

तसेच फिर्यादी यांच्या आई-वडिलांच्या खात्यावरील पैसे, एफडी सर्टिफिकेट मोडून आलेले पैसे, सोन्याचे दागिने गहाण ठेवून मिळालेले पैसे, पीडित तरुणीचे कॉलेज फीचे पैसे असे एकूण ३० लाख रुपये आरोपी अरबाज याने स्वत:च्या व वडिलांच्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!