“लोक मला नोटही देतात आणि व्होटही देतात, खिशातून पैसे काढले अन् राजकीय वर्तुळात उडाली खळबळ!

Nilesh Lanke : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतांना दिसत आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असतांना निलेश लंके यांनी प्रचारादरम्यान एक विधान केले आहे.
“लोक मला नोटही देतात आणि व्होटही देतात. यावेळी त्यांनी खिशातून पैसे काढून दाखवत कुणी, किती रुपये दिले, याची देखील माहिती दिली आहे. सध्या राजकीय वर्तुळाची त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
सर्वसामान्य लोकांकडूनच आपल्याला आर्थिक मदत मिळत आहे, असे निलेश लंके यांनी यावेळी नमूद केलं आहे. त्यांनी अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे.
एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले १०० रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने कष्टाने कमवलेले ५०० रुपये निवडणुकीसाठी मला मदत दिली, असेदेखील निलेश लंकेंनी यावेळी सांगितले आहे.
Views:
[jp_post_view]