जमेल तेवढे पैसे भरा, ऐपत नसेल तर ससूनला जा! गर्भवती मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती आली समोर…

पुणे : काल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला. पैसे न भरल्याने उपचार केले नाहीत. त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणात भिसे कुटुंबियांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. पोलीस आज रुग्णालयात जाऊन चौकशी सुरू केली आहे.
रुग्णालयातील सीसीटीव्हीही तपासण्यात आले आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या रूग्णालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे. त्याचबरोबर या रूग्णालयाची या घटनेनंतर चौकशी सुरू आहे. आज याठिकाणी मोठा गोंधळ झाला. अनेकांनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली.
आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे. त्यांचा अहवालही समोर आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, 2023 साली त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांना गरोदर न राहण्याचा आणि त्याऐवजी मूल दत्तक घेण्याचा सल्ला रुग्णालयाने दिला होता. गरोदरपणात, त्यांनी रुग्णालयाने सुचवलेल्या किमान तीन प्रसूतीपूर्व तपासण्या (ANC) इथे करून घेतल्या नव्हत्या.
डॉक्टरांनी त्यांच्या गरोदरपणातील गंभीर धोक्यांची कल्पना दिली होती आणि दर आठवड्याला तपासणीसाठी यायला सांगितले होते, पण त्या नंतर आल्या नाहीत. रोदरपणातील धोका लक्षात घेता, त्यांना देखरेखेसाठी दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना संभाव्य धोके, जुळ्या (7 महिन्यांच्या) बाळांना कदाचित दोन अडीच महिने NICU मध्ये ठेवण्याची गरज आणि त्यासाठी येऊ शकणारा 10 ते 20 लाखांपर्यंतचा सांगण्यात आला होता.
यानंतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयातील कोणालाही न कळवता निघून गेले. पैशांची व्यवस्था न झाल्यास ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉ. घैसास यांनी पतीला दिला होता. नंतर मात्र धक्कादायक प्रकार काल समोर आला. यामुळे राज्यात खळबळ उडाली.