राजकारणातील सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांच्या सर्वात जवळचे जयंत पाटीलही अजित पवार गटाकडे जाणार.?


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेससह अवघ्या राज्यात अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे खळबळ माजली आहे. त्यातच आता शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे जयंत पाटील हे सुद्धा अजित पवारांना सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्या गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार आमचे विठ्ठल आहेत, पण त्यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हे बडवे नेमके कोण याची चर्चा रंगली होती.

यासंबंधी जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड या प्रमुख नेत्यांची नावे पुढे आली. पण आता अजित पवारांच्या गटाने जयंत पाटील यांनाच फोडून आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, यासंबंधी त्यांची जयंत पाटील यांच्याशी प्राथमिक टप्प्यातील चर्चाही झाली आहे. पण पाटील यांनी या प्रयत्नांना अद्याप अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. ते शरद पवार यांच्यासोबत राहण्याच्या मुद्यावर ठाम आहेत.

त्यानंतरही त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या बंडानंतर जयंत पाटील यांनीच शरद पवारांतर्फे त्यांची बाजू मांडली होती. सध्याही ते अजित पवार व त्यांच्या समर्थकांवर टीकेची झोड उठवण्यात अव्वल क्रमांकावर आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!