लालबागच्या दर्शनासाठी पार्थ पवार आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस एकसोबत, पार्थ पवार यांनी पैसे काढून जॅकलिनकडे दिले अन्…

मुंबई : गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेशत्सोवाच्या पहिल्याच दिवशी अनेक व्हिआयपींनी ‘लालबागचा राजा’चं मनोभावे दर्शन घेतलं. याठिकाणी दरवर्षी लाखोंचा जनसागर उसळतो. काही सेकंदासाठी तरी ज्या ‘राजा’चं दर्शन व्हावं यासाठी भक्तगण तास न् तास रांगेत उभे असतात. तर गेल्या वर्षात अनेक सेलिब्रिटी आणि व्हिआयींची गर्दीही वाढताना दिसत आहे.

असे असताना यात आता एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सह आणखी काही अभिनेत्रींनी दर्शन घेतलं. पण जॅकलिन फर्नांडिसचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारही जॅकनिलसोबत दर्शनाला आले होते.
यामुळे याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. जॅकलिन फर्नांडिस तसंच पार्थ पवार यांनी एकत्र लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. राजाचे दर्शन घेताना तिनं डोक्यावर ओढणी घेतली होती. तसंच मनोभावे पूजा केल्याचंही पाहायला मिळाले. यावेळी पार्थ पवार यांच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. पार्थ पवारांनी त्यांच्या खिशातून पैसे काढले आणि जॅकलिनच्या हातात दिले.

जॅकलिननं त्या नोटा बाप्पााच्या दानपेटीत टाकल्या. यानंतर दोघांनी चरणस्पर्श करत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि दोघेही तिथून निघाले. हा विडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबत आता ते दोघे एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जॅकलिन अडचणीत आली होती.
तिची चौकशी देखील करण्यात आली होती. नंतर ती बॉलीवूडपासून देखील लांब गेली. आता ती अचानक पार्थ पवार यांच्यासोबत दिसून आल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून अनेकांनी या विडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यावर आता अजून कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.