Pandharpur News : मोठी बातमी! ना फडणवीस, ना अजित पवार, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही, मंदिर समितीचा निर्णय

Pandharpur News : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. अजूनही समाजात सरकारविषयी नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या मंदिर समितीनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समिती कार्तिकी पूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, अशी भूमिका मंदिर समितीने घेतला आहे.

कार्तिकी सोहळ्याच्या तयारी संदर्भात आज मंदिर समितीची बैठक पार पडली. यंदा कार्तिकीची महापूजा नेमकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार हा पेच मंदिर समिती समोर निर्माण झाला होता. Pandharpur News
राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित द्यावे की अजित पवार यांना हा पेच समितीसमोर निर्माण झाला. दरम्यान आज यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला न बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणामुळे कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. Pandharpur News

पंढरपुरातही हे आंदोलन अधिक आक्रमक होत आहे. मराठा समाजाच्या या आंदोलनाचा कार्तिकी एकादशीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला होता.
मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने अखेर हा निर्णय घेतला आहे. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे.