लवकरच पाकिस्तानचे तुकडे होणार….!

हरिद्वार : योगगुरू स्वामी रामदेव यांनी पाकिस्तानच्या सद्यस्थितीवर वक्तव्य करताना म्हटले की, लवकरच पाकिस्तानचे तुकडे होणार आहेत. लवकरच बलुचिस्तान पीओके आणि सिंध प्रदेश भारतात विलीन होईल आणि पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून राहील.
श्रीरामचरितमानस आणि भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या चर्चेवर रामदेव म्हणाले की, देशात धार्मिक दहशतवाद सुरू आहे. सनातन संस्कृतीचा ऱ्हास करणे हा ज्यांचा उद्देश आहे, अशा लोकांना कडाडून विरोध केला पाहिजे.
हरिद्वार येथील पतंजली योगपीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
Views:
[jp_post_view]