राज्यात हाहाकार! ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर; पुढील २४ तास धोक्याची, मोठा इशारा..

पुणे : राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. हेच नाही तर अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय. रेड अलर्टसह ऑरेंज अलर्ट अनेक भागांमध्ये जारी करण्यात आला.

रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे, धाराशिव, नांदेड या भागात सकाळी पावसाचा जोर वाढला. मुंबई सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काळोखा पसरला आहे. दुसरीकडे पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे आणि नवी मुंबईत दिवसभर मुसळधार सरी कोसळणार आहेत. नेरुळ, वाशी, बेलापूर, कल्याण आणि डोंबिवलीसारख्या भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहतूक विस्कळीत होऊ शकते. हवामान खात्याने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे.

पालघर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. किनारी व ग्रामीण भागात सततच्या पावसामुळे नद्यांची पातळी वाढली असून शेतजमिनींमध्ये पाणी साचले आहे. येथे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झालीये. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेश काढले. नांदेड शहरातील जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात तळ्याचे स्वरूप.
नागरिकांनी खबरदारी घेण्याच जिल्हा प्रशासनाने आवाहन केले. सोलापुरातील सीना नदीत पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. सिना- कोळेगाव धरणातून , खासापुरी आणि चांदणी प्रकल्पतून ७५ हजार ८१७ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु.
दरम्यान, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
