शिरूर दौंडसह राज्यात 67 नगरपरिषदांपैकी 34 नगरपरिषदा OBC महिलांसाठी राखीव, जाणून घ्या संपूर्ण यादी…


पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाचे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. अखेर सोमवारी (ता.६ ऑक्टोबर) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, कोणत्या शहरात कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण लागणार, याची उत्सुकता अखेर संपली आहे. यंदाच्या आरक्षणात राज्यातील एकूण ६७ नगरपरिषदांपैकी ३४ नगराध्यक्ष पदे ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत.

ही आरक्षण सोडत राजकीय दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जात आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षांचे उमेदवारी गणित बदलण्याची शक्यता असून, राजकीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

       

ओबीसी महिला आरक्षित नगरपरिषदांची यादी खालील प्रमाणे..
दौंड, शिरूर, भगूर, विटा, इगतपुरी, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, कुलगाव-बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड-जंजीरा काटोल माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर-नवाबपूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा-वरवडे, बाळापूर रोहा, धामणगाव रेल्वे, वरोरा, कुरडुवाडी.

दरम्यान, आरक्षणानंतर स्थानिक राजकारणात हलचल वाढली आहे. ओबीसी महिला उमेदवारांना मोठ्या संधी प्राप्त झाल्या असून, यामुळे राजकीय पक्षांना नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!