तुमच्याकडे शेवटची संधी! …अन्यथा मोफत रेशन मिळणार नाही, रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती आली समोर

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे, ज्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर अनुदानित अन्नधान्य मिळणे बंद होऊ शकते. त्यानंतर ई-केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची e-KYC पडताळणी बंधनकारक आहे. राज्यातील सर्व रास्त भाव दुकानांवर ही मोहीम सुरू आहे आणि नागरिकांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.
भोर तालुक्यातील एकूण १,१८,३३५ पैकी ४१,२४८ नागरिकांचे e-KYC अद्याप पूर्ण झालेले नाही. तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
रेशन कार्ड e-KYC प्रक्रिया कशी कराल?
नजीकच्या रास्त भाव दुकानात जा – आधार क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रांसह जा.
बायोमेट्रिक पडताळणी करा – अंगठ्याचा ठसा किंवा ओटीपीच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करा.
रेशन कार्ड लिंक करून अपडेट मिळवा – e-KYC पूर्ण झाल्याची खात्री करून घ्या.
रेशन कार्डधारकांनी अंतिम तारखेपूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही.