पुणेकरांनो सावधान! फक्त १३ तास उरले; उद्यापासून ग्रुपने बाहेर पडता येणार नाही, सरकारचा मोठा निर्णय

पुणे : शहरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाकडून पुढील १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, निदर्शने किंवा जाहीर सभा घेण्यावर निर्बंध असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या राज्यभरात विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरून आंदोलनांचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सार्वजनिक शांतता भंग होऊ नये आणि वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
या आदेशादरम्यान सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या-काठ्या, तलवारी, दगड किंवा स्फोटक पदार्थ बाळगण्यास बंदी असणार आहे. तसेच भडकाऊ घोषणाबाजी, चिथावणीखोर भाषणे किंवा सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्या कृतींवरही कडक निर्बंध असतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, पुणेकरांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
