Onion Rate : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या दरात मोठी तेजी, मिळतोय विक्रमी भाव, जाणून घ्या…

Onion Rate : निर्यातबंदी संपल्यानंतर कांद्याचे दर रोज नवनवे विक्रम करताना दिसत आहे. तसेच महाराष्ट्रातील कांद्याचा भाव प्रतिक्विंटल ४००० रुपयांच्या वर गेला असून, शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा हा भाव चांगला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे .

सरकारच्या धोरणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई होत असल्याने शेतकरी आनंदी आहेत. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी राज्यातील तीन मंडयांमध्ये कांद्याचा भाव प्रतिक्विंटल ४,००० रुपये आणि त्याहून अधिक होता.
दरम्यान, त्यामागचे कारण म्हणजे निर्यात सुरू करणे आणि आवक कमी असणे. राज्यात कांद्याचे उत्पादनही घटले आहे, त्यामुळे भाव वाढत आहेत. महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक आहे, ज्याचा एकूण उत्पादनात वाटा ४३ टक्के आहे. Onion Rate

कोणत्या शहरात काय आहे कांद्याचे किंमत?
१८ जून रोजी नागपूरच्या कामठी मंडईतील किमान भावही ३००० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचल्याचे मंडळाने सांगितले. कमाल ४००० रुपये तर सरासरी दर ३५०० रुपये नोंदवला गेला. तसेच जुन्नर, पुणे येथे कमाल ४११० रुपये तर सरासरी २८०० रुपये भाव मिळाला.
अमरावती फळ व भाजीपाला बाजारातही कांद्याला कमाल ४ हजार रुपये तर सरासरी २७५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. चालू रब्बी हंगामात पहिल्यांदाच एवढ्या बाजारपेठेत एकाच वेळी शेतकऱ्यांना चार हजार रुपये दर मिळाला आहे.