मोठी बातमी! ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला अखेर मोदी कॅबिनेटची मंजुरी, लवकरच संसदेत सादर करण्याची तयारी….


नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सरकार हे विधेयक आता संसदेत सादर करण्याची शक्यता आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात जेपीसी स्थापन करून सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जातील. यानंतर हे विधेयक संसदेत सादर करून संमत केले जाईल. तत्पूर्वी, रामनाथ कोविंद यांच्या समितीने सरकारला यासंदर्भात अहवाल सादर केला होता. सध्या देशात वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या वेळी निवडणुका होतात.

मात्र हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, एकाच वेळी सर्वत्र निवडणुका घेतल्या जातील. सर्वात आधी संयुक्त संसदीय समिती गठीत केला जाईल. यानंतर सर्व पक्षांकडून सूचना, सल्ले मागवले जातील.

अखेरीस हे विधेयक संसदेत आणलं जाईल आणि नंतर ते पारित केलं जाईल. याआधी रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने सरकारकडे ‘एक देश, एक निवडणूक’ संदर्भात आपला रिपोर्ट सादर केला होता.

दरम्यान दीर्घ चर्चा आणि एकमत झाल्यानंतर सरकारने आता हे विधेयक संयुक्त संसदीय समितीसमोर पाठवण्याची योजना आखली आहे. जेपीसी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करणार असून, सामूहिक सहमतीसाठी प्रयत्न करेल. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी निवडणुका होत असतात. हे विधेयक आल्यानंतर देशात एकाच वेळी निवडणुका करण्याची तयारी असेल.

सर्व राज्यांच्या विधानसभांच्या अध्यक्षांना विचारवंत, तज्ञ आणि नागरी समाजाच्या सदस्यांना त्यांचे विचार मांडण्यास सांगितले जाईल. याशिवाय सर्वसामान्यांकडूनही सूचना मागवल्या जातील, ज्यामुळे निर्णय प्रक्रियेत सर्वसमावेशकता आणि पारदर्शकता वाढेल. विधेयकाचे फायदे आणि देशभर एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यपद्धतीसह या विधेयकाच्या प्रमुख पैलूंवर चर्चा केली जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!