रात्री 2.30 वाजता मित्राला मेसेज; पहाटे 4 वाजता प्रकृती गंभीर, नाना पाटेकरांच्या अखेरच्या तासांत नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने आणि सामाजिक बांधिलकीने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
नाना पाटेकर यांच्या निधनापूर्वीच्या काही तासांमध्ये नेमकं काय घडलं, याची माहिती आता समोर आली आहे. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सुमारे 45 मिनिटे शर्थीचे प्रयत्न केले.

पहाटे मित्राला केला मेसेज
मणिपाल हॉस्पिटलचे डॉ. शेखर सालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 2.30 वाजता नाना पाटेकर यांनी आपल्या एका मित्राला तब्येत ठीक नसल्याचा मेसेज केला होता. मात्र, रात्रीची वेळ असल्याने मित्राला हा मेसेज त्यावेळी पाहता आला नाही.


नंतर मित्राने नाना पाटेकर यांना फोन केला आणि पहाटे सुमारे 4 वाजता त्यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी नाना पाटेकर यांना प्रचंड घाम फुटला होता आणि त्यांची प्रकृती वेगाने खालावत होती. त्यांना प्राथमिक मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, काही वेळातच त्यांची शुद्ध हरपू लागली.
केअरटेकरला रुग्णालयात पाठवलं अन्…
नाना पाटेकर यांची प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या मित्राने केअरटेकरला जवळच्या रुग्णालयात पाठवले. केअरटेकरने रुग्णालयात पोहोचून डॉक्टरांना परिस्थितीची माहिती दिली.
यानंतर रुग्णालयाची इमर्जन्सी टीम तातडीने नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी पोहोचली. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आणि कार्डियाक मसाज करण्यात आला.
त्यानंतर पहाटे सुमारे 4.20 ते 4.30 वाजण्याच्या दरम्यान नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती डॉ. शेखर सालकर यांनी दिली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला
डॉ. सालकर यांच्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या टीमने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे नोंदवण्यात आले असून, ही मेडिको-लीगल केस (MLC) असल्याचे त्यांनी सांगितले.
नाना पाटेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आल्याची माहितीही डॉ. सालकर यांनी दिली.
