‘मार्च’च्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य लोकांना महागाईचा झटका, गॅस सिलेंडर महागला….


पुणे : सर्वसामान्यांना मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. महागाईने होरपळलेल्या जनतेला आणखी एक फटका बसला आहे. एक मार्च 2025 रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

यामुळे आधीच महागाईने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी सरकारकडून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. मात्र आज एक मार्च 2025 रोजी पुन्हा गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. आज 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती म्हणजे 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमती आजही कायम ठेवण्यात आल्या आहेत.

नव्या रेटानुसार आता देशाच्या राष्ट्रीय राजधानीत अर्थात दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1,803 रुपयांना मिळेल, जो फेब्रुवारीमध्ये 1,797 रुपयांना मिळतं होता. तसेच कोलकाता येथे त्याची किंमत 1,913 रुपये झाली आहे, जी फेब्रुवारीमध्ये 1,907 रुपये होती.

दरम्यान, १ मार्च २०२५ रोजी, इंडियन ऑइलने १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ केली आहे. १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 1 फेब्रुवारी रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 7 रुपयांनी कमी करण्यात आली होती.

पण आज ती 6 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत. यामुळे होळी आणि रमजानच्या महिन्यात अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महागाई वाढली असून आता यामध्ये अजून भर पडली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!