गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला दौंड हादरलं! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून विटा, सिमेंटच्या चौकटीनं बेदम मारहाण, २७ तरुणाच्या मृत्यूने खळबळ..

दौंड : दौंड शहर गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला भीषण घटनेने हादरले आहे. बहिणीला पळवून नेल्याच्या वादातून चौघांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विटा आणि सिमेंटच्या चौकटीने केलेल्या जबर मारहाणीमुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

केतन सुडगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो स्थानिक रहिवासी होता. चार आरोपींनी त्याला अडवून निर्दयी मारहाण केली. या हल्ल्यात विटा आणि सिमेंटच्या चौकटीचा वापर करण्यात आला.
गंभीर दुखापतींमुळे केतनचा मृत्यू झाला. या घटनेने दौंड परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी निखिल चितारे, प्रेम जाधव, विवेक कांबळे आणि विक्रांत कांबळे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून हा खून घडल्याचे समोर आले आहे. आरोपींनी कट रचून केतनवर हल्ला केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.खूनानंतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींवर खटला चालवला जाणार आहे. दरम्यान, हा प्रकार गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेची चौकशी वे