अधिकाऱ्यांचा अजब प्रताप!! ऑन ड्युटी मटण पार्टी, बांधकाम विभागाचा कारभार, नेमकं काय केलं?


पुणे : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दक्षिण विभागाकडून साक्षात कार्यालयीन वेळेतच सर्किट हाऊसमध्ये ‘आखाड पार्टी’चे आयोजन करण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कार्यालयाच्या खिडक्या बंद, खुर्च्या रिकाम्या आणि फोनही न उचलणाऱ्या स्थितीने नागरीक हैराण झाले.

मिळालेल्या माहिती नुसार, दुपारी एक वाजल्यापासून तब्बल चार वाजेपर्यंत विभागाचे जवळपास सर्व अधिकारी आणि कर्मचारी सर्किट हाऊसच्या बिर्याणीवर ताव मारताना दिसले. कार्यालयाच्या खिडक्या बंद, खुर्च्या रिकाम्या आणि फोनही न उचलणाऱ्या स्थितीने नागरीक हैराण झाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे नेतृत्व दक्षिण विभागाच्या महिला कार्यकारी अभियंता यांनीच केल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी कार्यालयातील कामकाज पूर्ण ठप्प झाले होते. सार्वजनिक हिताच्या कामाकडे पाठ फिरवून सरकारी यंत्रणेकडून मस्त मजा मारल्याची चर्चा रंगली आहे.

दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलण्याचेही कष्ट घेतले नाहीत. त्यामुळे अधिकृत भूमिका मिळालेली नाही.

नागरीक झाले संतप्त..

दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर नागरीक संतप्त झाले आहेत.“ही लोकांची पगारावर मजा मारणारी यंत्रणा आहे का बिर्याणी खाणारी संस्था?”असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!