अगं हा तर तुझा व्हिडिओ! तरुणीचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ मैत्रिणीला पॉर्न वेबसाइटवर दिसला अन्…पुण्यात खळबळजनक घटना समोर

पुणे : पुण्यातील एका २४ वर्षीय तरुणीसोबत अत्यंत गंभीर आणि विश्वासघातकी प्रकार घडला आहे. प्रेमसंबंध असतानाच्या खाजगी क्षणांचे व्हिडीओ तरुणीच्या नकळत चित्रीत करून, लग्नाला नकार दिल्याच्या रागातून ती व्हिडीओ क्लिप पोर्न साईटवर टाकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका २४ वर्षाच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विनय शिरीष कुलकर्णी (वय २७, रा. फुलेवाडी, रिंगरोड, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० डिसेंबर २०२३ ते १२ मे २०२५ या दरम्यान घडला असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी एका प्रतिष्ठित कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहे. आरोपी ऑटोमोबाइल इंजिनिअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या दरम्यान, दोघांच्या संमतीने त्यांचे शारीरिक संबंध झाले.

याच वेळी आरोपीने तरुणीला कोणतीही कल्पना न देता तिच्या नग्न अवस्थेतील व्हिडिओ चोरून काढले. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांचे संबंध तुटले आणि तरुणीने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर जवळपास एक वर्षापासून दोघांमध्ये कोणताही संपर्क नव्हता.
या घटनेला एक भयंकर आणि अनपेक्षित वळण तेव्हा मिळाले, जेव्हा पीडित तरुणीच्या एका मैत्रिणीला एका पॉर्न वेबसाइटवर तिचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ दिसला. आपली मैत्रीण अशा अवस्थेत इंटरनेटवर पाहून तिला मोठा धक्का बसला आणि तिने तातडीने पीडित तरुणीला याबद्दल माहिती दिली.
दरम्यान, हे सत्य समजताच पीडित तरुणी पूर्णपणे हादरून गेली आणि तिने त्वरित अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्यासोबत घडलेल्या या गंभीर प्रकाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून घेतला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.