मोठी बातमी ! राज्यातील बांधकाम कामगारांची दिवाळी गोड ५ हजारांचा बोनस जाहीर; मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई : राज्यातील ५४ लाख ३८ हजार ५८५ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना येत्या दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली राज्यमंत्रीमंडळाची
शेवटची बैठक संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या उपकरणातून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकरामधून सुमारे २७१९ कोटी २९ लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.
Views:
[jp_post_view]