आता रेल्वे प्रवासात राहणार तुमच्यावर २४ तास नजर, रेल्वे विभागाने घेतला सर्वात मोठा निर्णय, जाणून घ्या…


नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच रेल्वे प्रशासनाने आता ट्रेनच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने सर्व प्रवासी डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे रेल्वेमधील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी यासंदर्भात तांत्रिक आढावा घेतला.

देशभरातील अनेक रेल्वेमार्गांवर प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने आता 74,000 डब्यांमध्ये आणि १५,००० रेल्वे इंजिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी नवे नियम लागू केले आहेत. आता प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, याची माहिती ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधीच मिळणार आहे. यापूर्वी फक्त ४ तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जात असे, त्यामुळे वेटिंग तिकिटधारकांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागत असे.

मात्र आता नवीन निर्णयाचा लाखो रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे. हा नवा नियम लवकरच देशभर लागू केला जाणार आहे. तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तत्काळ तिकिटे पूर्वीप्रमाणे प्रवासाच्या एक दिवस आधीच बुक करता येतील व त्यांची कन्फर्मेशन प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!