‘आता ही शेवटची फाईट, विजयाचा गुलाल लावायचाचं ; मनोज जरागेंचा सरकारला थेट इशारा


बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर आज बीडच्या मांजरसुंबा येथून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. आता ही शेवटची लढाई आहे, आता मुंबईला गेल्यावर ही आरक्षणाची शेवट फाईट आहे. आरक्षणाचा गुलाल उधळून यायचा आहे, तोपर्यंत मैदान सोडायचं नाही असा निर्धार जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला.

येत्या 27 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथून आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा करताना मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.बीड जिल्ह्याला आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे विशेष आव्हान त्यांनी यावेळी केले. मनोज जरांगे म्हणाले की, बीडचे मराठे एकत्र येत आहेत. गडबडीने समाजाचे वाटोळं होत आहे. आता पुढचा काळ लढायचा आहे. समाजाला आवाहन आहे की, आपली ताकद मोठी आहे. आता विचार करून पुढे लढायचे आहे. बीडचे रूप पाहून सरकार बेजार होईल. 29 तारखेला चलो मुंबई… आपल्याला शांततेत जायचं आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केला.

पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका देखील केली. ते म्हणाले, अंतरवली सराटी येथे झालेल्या विराट सभेसाठी दोन करोड लोक आले होते. पण कोणत्याही आंदोलकांनी पोलिसांना त्रास दिला नाही पण मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलीस मात्र आंदोलकाला त्रास देत आहे असा आरोप त्यांनी केला.फडणवीस साहेब मी मुंबईत येतोयआम्ही शांततेत आरक्षण मागत आहोत. बीडमध्ये तुम्हाला दंगल घडवायची होती का? सत्ता बदलणार आहे. त्यावेळी आम्ही नक्की लक्षात ठेवू, असा इशारा त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!