आता दर तीन महिन्यांनी जाहीर होणार दुधाचे खरेदी दर! सरकारने घेतली दखल…

मुंबई : गेल्या काही दिवसांत दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात होती. आता सरकारने यासाठी मोठी निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात दूध दर निश्चित करण्यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या समितीमध्ये सरकारी प्रतिनिधींसह खाजगी व सहकारी दूध प्रकल्पातील प्रतिनिधींची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच दूध उत्पादकांचे प्रतिनिधी देखील घेण्यात आले आहेत. ही कमिटी दर तीन महिन्यांनी वर्तमान स्थिती लक्षात घेऊन दुधाचे खरेदी दर निश्चित करणार आहे. यामुळे दरामध्ये समतोल राहील.
यामुळे सहकारी व खाजगी दूध संघाचा चालवण्याचा खर्च आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन हा निर्णय होणार आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला किमान दूध भाव मिळण्यासाठी व दुधाचे दर निश्चित करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे.
आता या प्रकारच्या समितीने तरी दूध उत्पादकांना न्याय द्यावा अशी दूध उत्पादकांची अपेक्षा आहे. शेतकरी याकडे लक्ष देऊन आहेत. येणाऱ्या काळात याबाबत शेतकरी आणि सरकार यामध्ये संघर्ष देखील होण्याची शक्यता आहे.