धोनीचा होणार गौरव! आता वानखेडेमधील ती जागा धोनीच्या नावाने ओळखली जाणार…!
मुंबई : भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. 2011 साली झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात MS धोनी वानखेडे स्टेडियम येथे स्वतःच्या फलंदाजीत ऐतिहासिक षटकार ठोकला होता.
त्या षटकाराचा चेंडू स्टेडियममध्ये ज्या जागी पडला ती जागा यापुढे महेंद्रसिंह धोनी च्या नावाने ओळखली जाणार आहे. यामुळे ही एक मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
श्रीलंकेविरुद्धचा तो अंतिम सामना जिंकत भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे अमोल काळे यांनी सांगितले आहे.
सध्या आयपीएल सुरू असून धोनीचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे त्याचे सामने बघायला अनेकजण येत असतात. धोनी आता किती सामने खेळणार कधी निवृत्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.