ऐकावं ते नवलच् ! पुण्यातील बाजापेठात आता ‘आंबे घ्या हप्त्यावर’…!


पुणे : फळांचा राजा आंब्याचे आगमन झालेले आहे. त्याच्या स्वागतासाठी आंबा प्रेमी उत्सुक असून आंबा घेण्यासाठी ग्राहकांची पावले बाजाराकडे वळलेली पाहायला मिळत आहेत. पण आंब्याचा भाव ऐकला की हे पावले थबकतात. पण आता काळजी नको, आता आंबे सुद्धा सुलभ हप्त्यावर मिळणार आहेत. ते ही पुण्यात !

पुण्यातील गौरव सणस या आंबे विक्रेत्याने ग्राहकांच्या मनातील भीती हेरून आणि खिसा पाहून एक अफलातून आयडिया लढवली आहे. त्यांनी चक्क EMI वर म्हणजे हप्त्यावर आंब्याची पेटी देणे सुरु केले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकही हे महागडे आंबे खरेदी करू शकणार आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गौरव सणस हे मागील अनेक वर्षापासून पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे नैसर्गिकरीत्या पिकवलेला देवगड हापूस मिळतो. या वर्षापासून त्यांनी दुकानात EMI वर आंबे विकण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या कल्पनेला यशही आलं असून आतापर्यंत त्यांच्याकडून दोन ग्राहकांनी ईएमआयवर आंबे विकत घेतले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

गौरव सणस यांनी सांगितले की, महागडा आणि न परवडणारा मोबाईल नागरिक ईएमआयवर घेतात तर आंबे का घेऊ शकणार नाहीत अशी कल्पना आमच्या डोक्यात आली. त्यानंतर पेटीएमच्या माध्यमातून ही कल्पना प्रत्यक्षात साकारली. इतकच नाही तर हा भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचंही गौरव सणस यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!