आता कुंभमेळ्याला जाण्यासाठी दौंडवरून रेल्वे, पुणे, सोलापूर मधील लोकांना होणार फायदा…


दौंड : उत्तर प्रदेश येथील कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक दाखल होत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे आता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेकडून म्हैसूर-टुंडला कुंभमेळा विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. यामुळे याचा पुणे सोलापूर येथील नागरिकांना फायदा होणार आहे.

यामध्ये सोलापूरहून जरी थेट रेल्वे नसली तरी दक्षिण पश्चिम रेल्वेकडून म्हैसूर-टुंडला-म्हैसूर महाकुंभ विशेष एक्स्प्रेस धावणार असल्याने सोलापूरकरांना दौंड कॉर्डलाईन येथे जाऊन तिथून पुढे प्रयागराजला जाता येणार आहे. यामुळे याबाबतची मागणी केली जात होती ती पूर्ण करण्यात आली आहे.

म्हैसूर-टुंडला स्पेशल एक्स्प्रेस 17 फेब्रुवारीला म्हैसूरहून रात्री 9:40 वाजता सुटेल आणि 20 फेब्रुवारीला सकाळी 9:30 वाजता टुंडला येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने टुंडला-म्हैसूर स्पेशल एक्स्प्रेस टुंडला येथून 21 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि 23 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता म्हैसूरला पोहोचेल. असा मार्ग असणार आहे.

राज्यातून खानापूर, मिरज, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, मनमाड, भुसावळ याठिकाणी ही गाडी थांबणार आहे. या गाडीस तीन एसी थ्री टायर कोच, 10 स्लीपर कोच कोच, दोन जनरल सेकंड क्लास कोच आणि दोन एसएलआर/डी डबे यासह 17 डबे असतील. यामुळे जागा उपलब्ध असेल. लवकरच बुकिंग केलं तर जागा मिळेल.

तसेच उत्तर प्रदेश येथे होत असलेल्या कुंभमेळ्याच्या समारोपास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री असल्याने प्रयागराज येथे जाणार्‍या भाविकांची संख्या वाढली आहे. यामुळे हा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!