दिल्ली मेट्रो झालाय kiss चा अड्डा?, आता पुन्हा एकदा कपल किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल…

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. असे असताना आता दिल्ली मेट्रो अश्लील चाळ्यांचा अड्डा असल्यामुळे बदनाम झाली आहे.

दिल्ली मेट्रो म्हटलं की आता कपल किसिंग करतानाचा व्हिडीओ डोळ्यासमोर येतो. दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासासाठी नाही तर कपल रोमान्सचं ठिकाण झालं आहे.
कोणाचीही लाज न बाळगता कपल एकमेकांना बिनधास्त KISS करताना दिसून आले आहेत. यामुळे याकडे लक्ष लागले आहे. मेट्रोमध्ये अश्लील चाळे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले जात आहे.

असे असले तरीदेखील मेट्रोमध्ये किस करताना एका कपलचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. नवीन व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कपल एकमेकांना अतिशय जवळ घेऊन किस करत आहे.

Kindly take action ASAP. pic.twitter.com/E0NPg11UUY
— Bhagat S Chingsubam (@Kokchao) June 18, 2023
धक्कादायक म्हणजे या डब्यात इतर महिला प्रवाशी असल्याचं दिसून येतं आहे. याच डब्यात बसलेल्या एका प्रवासाने हा व्हिडीओ तयार केला आणि त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
दरम्यान, दिल्ली मेट्रोमध्ये अशा घटना वाढल्यामुळे डीएमआरसीने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक पथकं स्थापन केले आहेत. मात्र तरीही देखील अशाप्रकारचे अश्लील चाळे करणाऱ्यामध्ये कुठलाही धाक दिसून येतं नाही आहे.