आता LPG गॅस सिलेंडरसाठी नवीन योजना लागू! बुकिंगसाठीचा नवा नियम जाणून घ्या…


नवी दिल्ली : केंद्र सरकारने गॅस सिलेंडरशी संबंधित काही महत्त्वाचे नियम संपूर्ण देशभर लागू केले आहेत. हे नियम सर्वच वर्गांवर प्रभाव टाकणारे आहेत. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. राशन कार्ड आणि गॅस सिलेंडर या केंद्र सरकारच्या नव्या योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे आणि ही योजना डिसेंबर 2028 पर्यंत सुरु राहणार आहे. ही एक फायदेशीर योजना आहे.

यामध्ये प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 6 ते 8 एलपीजी सिलेंडर मिळणार आहेत. यामध्ये सगळी प्रक्रिया प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असून, यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये गॅस सिलेंडरची बुकिंग करण्याआधी ग्राहकांनी आपली KYC अनिवार्यपणे अपडेट करावी लागणार आहे. आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि अन्य तपशील गॅस एजन्सीकडे द्यावे लागणार आहे.

यासाठी आधार क्रमांक मोबाइलशी लिंक असणे आवश्यक आहे. गॅस सिलेंडर पोहोचवताना आता OTP वेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. सिलेंडर बुकिंग करताना जो OTP ग्राहकाला मिळतो, तो डिलिव्हरी बॉयकडे सांगावा लागणार आहे. गॅस सबसिडीसाठी ग्राहकाचे आधार, बँक खाते आणि गॅस कनेक्शन एकमेकांशी लिंक असणे आवश्यक आहे.

नंतर सबसिडी थेट खात्यात जमा होईल. असे असले तरी गरजेपेक्षा जास्त सिलेंडर घेतल्यास सबसिडी मिळणार नाही. या नव्या नियमांमुळे सर्व प्रक्रिया पारदर्शक होत असून फसवणुकीला आळा बसेल. OTP मुळे चुकीच्या पत्त्यावर डिलिव्हरी होण्याचा धोका टळेल आणि सबसिडी थेट ग्राहकाच्या खात्यात जमा होईल. यामुळे ही सोप्पी प्रक्रिया आहे..

यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये मोबाईल नंबर, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते, गॅस कनेक्शन बुक आणि e-KYC अपडेट यांचा समावेश आहे. यामुळे यामुळे येणाऱ्या काळात याबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक असून याचा थेट फायदा होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!