आता सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तके आणि गणवेश!! जिल्हा परिषदेचा निर्णय..

पुणे : पुणे जिल्हा परिषदेने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. समग्र शिक्षा पुणे जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षासाठी या वर्षीपासून समग्र पुणे जिल्हा शिक्षण परिषदेच्या अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या एकूण २ लाख ७२ हजार ३५ विद्यार्थी व इयत्ता पाचवी ते आठवी २ लाख ४७ हजार ९१० अशा इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण ५ लाख १९ हजार ९४५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोच झाली आहेत.
याबाबत माहिती माहिती पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी दिली. पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहेत.
तसेच विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार आहे. चारही भागात सर्व विषयांचा समावेश असून अनुक्रमे एका वेळेस एकाच भागाचे अध्यापन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी एका वेळी एकच पुस्तक आणू शकेल.
तसेच गणवेश देखील दिला जाणार आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट कमी झाला आहे. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.