काम करत नाही, नुसती साखर भात खातेस, आई मुलीवर ओरडली अन् १६ वर्षांच्या मुलीने आयुष्यच संपवलं, घटनेने सगळेच सुन्न…

पालघर : साखरभात खाताना आई फक्त ओरडली, म्हणून एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातल्या वसईतील वेलचीपाडा परिसराच्या आदर्शनगर सोसायटीत घडली आहे.
इच्छा राजभर असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.१०) रोजी ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, सकाळच्या वेळी साखरभात खात असलेल्या इच्छा हिला तिच्या आई ओरडली. काम करत नाही, पाणी भरत नाही आणि नुसती खाते असे काहीसे म्हणाले. आई निघून जाताच तिने रागाच्या भरात छताच्या लोखंडी अँगलला ओढणी बांधली आणि गळफास घेतला.
दरम्यान, या घटनेनंतर वालीव पोलीस ठाण्यातील पोलीस आदर्शनगर सोसायटीत पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करून शिवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेप्रकरणी वालीव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमागील मुख्य कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.