भारतातच नव्हे तर जगभरात कांदा खातोय भाव ! जाणून घ्या जगभरातील कांद्याचे भाव ..!!

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून हवामानातील बदल शेती उत्पन्नावर मोठा परिणाम करीत आहे. जगभरात या परिणामांचा मोठा फटका शेतीमाल तुटवड्यावर जाणवू लागला आहे. मात्र शेती उत्पादन हा परिणाम जाणवू लागला असला, तरी शेतकऱ्यांना मात्र काही प्रमाणात हा परिणाम दिलासादायक ठरु लागला आहे. ऐन थंडीत भाज्यांचे भाव उंचावले आहेत. कधी टोमॅटो तर कधी कांदा भाजीपाल्याचे भाव जनतेसाठी अडचणीचे ठरत होते.
सरकारने भाव नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना
केल्या असल्या तरी कांद्याचे दर आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहेत. देशभरात प्रमुख शहरांत
कांद्याचा भाव ६० रुपये प्रतिकिलो आहे. अशीच आवस्था जगभरात असून अमेरिकेत कांदा कोणत्या दराने विकला जातो हे तुम्हाला माहिती आहे का, चला जाणून घेऊया… (America Onion Rate)
कांद्याचे भाव केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही चांगले आहेत. जर आपण अमेरिकेबद्दल बोललो तर इथेही कांद्याचे भाव भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. वृत्तानुसार, सध्या अमेरिकेत कांद्याचा भाव 240 ते 250 रुपयांपर्यंत आहे. अहवालानुसार, युरोपमध्ये कांद्याचा बराच काळ तुटवडा आहे, त्यामुळे अमेरिकेत कांद्याची मागणी वाढली आहे. अमेरिकेत पीक टंचाई आहे, त्यामुळे कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे.
आकडेवारी काय सांगते?
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2020 मध्ये अमेरिकेने 392,389 मेट्रिक टन कांद्याची विक्री केली होती. त्याच वेळी, मध्ये अमेरिकेने 428,449 टन कांदा विकला. एकट्या 2019 मध्ये, अमेरिकन कांद्यामध्ये (भाजीपाला श्रेणी) स्वारस्य वाढले आहे, 2018 च्या तुलनेत 10.772% ने बदल नोंदवला आहे. 2017 ते 2019 या कालावधीत कांद्याच्या निर्यातीत 19.25 टक्के वाढ झाली आहे.
हे आहेत अमेरिकेतील प्रमुख शहरांतील कांद्याचे दर
न्यूयॉर्क – रु. 240
लॉस एंजेलिस – रु. 250
शिकागो – रु. 230
ह्यूस्टन – रु. 220
फिलाडेल्फिया – रु. 245