नितेश राणे यांनी मालवणमध्ये केला राडा! भाजप कार्यकर्त्याकडे धाड टाकली अन् सापडले २५ लाख, स्टिंग ऑपरेशनमध्ये काय घडलं?

मालवण: शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काल थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली.निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले.

यावेळी निलेश राणेंना विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली. या कारवाईदरम्यान एका बॅगेत तब्बल २५ लाख रुपये रोख रक्कम आढळल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे.

आमदार निलेश राणे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे ही कारवाई जनतेसमोर आणली. मालवण नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

राणे यांच्या मते, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मालवण दौऱ्यानंतरच अशा प्रकारची नाटकं सुरू झाली आहेत. “निवडणुका निष्पक्ष पद्धतीने झाल्या पाहिजेत. ही कोणती पद्धत आहे?” असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
राणे म्हणाले की, शहरात ८-१० घरी २५ ते ५० लाखांची बॅगच बॅग पडली आहे. यावर निवडणूक आयोगाने चौकशी करावी. भाजपचे काही कार्यकर्ते रोज पैशाच्या बॅगा पोहोचवतात, हे माहित असून आम्ही तक्रार देणार आहोत. राणे यांच्या या व्हिडिओ नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला घेतले आणि राणे यांचे कौतुक करत हे तर भाजपचे चिखलाने माखलेले पाय आहेत अशा स्वरूपाची टीका केली.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना राणेंचं थेट अभिनंदन करत भाजपवर आणखी एक फटकारा मारला. राणे यांनी मालवण शहरातील भाजप कार्यकर्ते विजय किंजवडेकर यांच्या घरावर चक्क दहा टाकली आणि त्यापूर्वीच त्यांनी निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांना पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून घेतले.
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांनी २५ लाख रुपयांची ही रक्कम दाखवली. राणे यांचा आरोप होता की, रवींद्र चव्हाण हे मालवण मध्ये आले आणि त्यानंतर इथले वातावरण बदलले आहे. फक्त किंजवडेकर यांच्याकडेच रक्कम नाही, तर अशा आठ ते दहा लोकांकडे रक्कम असून ही एवढीच रक्कम नाही. घरात अजूनही पैसे आहेत असा आरोप त्यांनी केला.
