दु:खदायक ! लडाखच्या लेह जिल्ह्यात दरीत वाहन कोसळून नऊ जवान शहिद !

नवी दिल्ली: लडाखच्या लेह जिल्ह्यात शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत नऊ जवान शहीद झाले आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आठ जवान आणि एका जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) यांचा समावेश आहे.
कियारीच्या जवळ हा अपघात झाला. सध्या रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून ती बचावकार्यात गुंतली आहे.
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अशोक लेलँड स्टॅलियन (एएलएस) वाहन जे काफिल्याचा एक भाग म्हणून ते न्योमाकडे जात होते, कियारीच्या सात किलोमीटर आधी घाटीत सुमारे ५.४५ ते ६ वाजता घसरले. वाहनात १० कर्मचारी होते, त्यापैकी नऊ जण ठार तर एक जखमी झाला. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Views:
[jp_post_view]