Nilesh Lanke : लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार! आता ‘असा’ करणार गनिमी कावा…
Nilesh Lanke : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आपली राजकीय फायदा लक्षात घेऊन वेगवेगळे नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत.
यामध्ये निलेश लंके यांचादेखील समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते तथा आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान ते जाहीर सभेत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Nilesh Lanke
आज लंके यांनी त्यांच्या समर्थकांची तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीत ते आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत, तसेच शरद पवार गटाच्या उमेदवारीबाबत निर्णय घेऊ शकतात. निलेश लंके यांनी आज सुपा-अहमदनगर मार्गावर एका बैठकीचे आयोजन केले आहे.
लंके यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक, सभासद आणि हिंतचिंतकांना या बैठकीला बोलावले आहे. या बैठकीत लंके कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशा हालचालींनाही सध्या वेग आला आहे. निलेश लंके यांच्या प्रवेशासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी प्रयत्न केले होते.
त्यामुळे लंके कोणत्याही क्षणी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या गटात सामील होऊ शकतात. तसे झाल्यास लंके यांना अहमदनगरची उमदेवारी दिली जाऊ शकते. याच कारणामुळे लंके आजच्या या बैठकीत आपल्या आमदारीकच्या राजीनाम्याची घोषणा करू शकतात. त्यामळे या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.