Nilesh Lanke : निलेश लंकेंनी घेतली नितीन गडकरी यांची भेट, भेटीच नेमकं कारण काय? चर्चांना उधाण…

Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी लोकसभेमध्ये खासदारकीची शपथ इंग्रजीतून घेतल्यामुळे एकच चर्चा राज्यात सुरु आहे. तसेच याच पार्शभूमीवर निलेश लंकेचा सध्या एक फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.

निलेश लंके यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत दिसत आहेत.
फोटो शेअर करत निलेश लंके यांनी लिहिले की, “देशाच्या रस्ते उभारणीत ज्यांचे बहुमूल्य योगदान आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची आज संसद भवन परिसरात भेट झाली. नेहमीप्रमाणे त्यांनी आपुलकीने जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली, दिलखुलासपणे संवाद साधला. ज्यांच्याकडे पाहून समाजसेवेची एक वेगळी ऊर्जा मिळते!” असे ट्विट लंके यांनी केले आहे. Nilesh Lanke

देशाच्या रस्ते उभारणीत ज्यांचे बहुमूल्य योगदान आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची आज संसद भवन परिसरात भेट झाली. नेहमीप्रमाणे त्यांनी आपुलकीने जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली, दिलखुलासपणे संवाद साधला. ज्यांच्याकडे पाहून समाजसेवेची एक वेगळी ऊर्जा मिळते! pic.twitter.com/2YXk2zHpkR
— Nilesh Lanke – निलेश लंके (@INilesh_Lanke) June 26, 2024
कोरोना काळात निलेश लंके यांच्या कामाचे भरपूर कौतुक…
दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात निलेश लंके यांच्या कामाचे भरपूर कौतुक झाले होते. त्याचबरोबर रस्त्यासाठी ज्यावेळी निलेश लंके उपोषणाला बसले होते, तेव्हा नितीन गडकरी यांनी स्वत: त्यांना फोन केला होता. आणि आता सध्या ही दिल्लीतील झालेली भेट सगळीकडे चर्चेत आहे.