निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी, हगवणे कुटुंबास मदत केल्यानं गुन्हा…

पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता पोलिस तपास अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. १६ मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं गळफास लावून जीवन संपवलं आहे. यानंतर तिच्या पतीसह सासरच्या पाच सदस्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच वैष्णवी हगवणे प्रकरणात शुक्रवारी पोलिसांनी निलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक केली. त्याला आज पुणे सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, सध्या राज्यभर गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात बंदुकीच्या धाकावर वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ स्वत:कडे निलेश चव्हाण याने ठेवले होते. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश चव्हाण हा मागील दहा ते बारा दिवसांपासून फरार होता. विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे पोलिसांनी त्याला नेपाळ बॉर्डरवरून शुक्रवारी अटक केली आहे.
वैष्णवी हगवणे कथित आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाण याने वैशाली हगवणे यांचे बाळ बंदुकीच्या धाकावर ताब्यात ठेवून त्याची हेळसांड केली, असा त्याच्यावर आरोप आहे.
त्यामुळे पोलिस निलेश चव्हाण याचा शोध घेत होते. मात्र तो विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. आज त्याला पुणे पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.