‘एनआयए’ ची 70 हून अधिक ठिकाणी छापे टाकून गुंडांच्या नेटवर्कवर कारवाई…!


नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी सकाळी सात राज्यांतील 70 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत.

गुंड आणि गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयएने ज्या राज्यांमध्ये छापे टाकले त्यात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. याशिवाय एजन्सीने दिल्ली आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांमध्येही तपास सुरू केला आहे.

एनआयएचे पथक पंजाबमधील जास्तीत जास्त 30 ठिकाणी छापे टाकत असल्याचे सांगण्यात आले आहे. एनआयएचा हा छापा म्हणजे गुंडांच्या नेटवर्कवरील कारवाईची चौथी फेरी आहे. याआधीही एजन्सीने वेगवेगळ्या राज्यात छापे टाकले आहेत.

 

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!